Weather Update : हवी हवी गुलाबी थंडी आता मुंबईकरांनाही जाणवायला लागली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असला तरी महाराष्ट्रातही थंडीची लाट वाढताना दिसत आहे. आज शनिवारच्या दिवशी मुंबईत सकाळपासून बोचरी थंडीसोबत धुक्याची चादर जाणवत आहे. मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांमध्ये उत्तर भारतात दाट धुकं आणि थंडा जोर वाढणार असल्याचं सांगितलं आहे. (Weather Update  Enjoy the pink winter at the weekend Temperature drop in North India including Mumbai Pune) 



उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारमधील बहुतांश ठिकाणी तापमान 7 ते 10 अंशांच्या दरम्यान असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान खात्यानुसार पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा 1 ते 3 अंशांनी कमी असणार आहे. 



कुठे असेल दाट धुके?


हवामान खात्याचा अंदाजानुसार 23 जानेवारीच्या सकाळपर्यंत, पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्री आणि सकाळी खूप दाट धुके असण्याची शक्यता आहे. तर आज उत्तराखंड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागात दाट ते दाट धुके पडू शकतं. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुढील 2 दिवस दाट धुक्याची चादर असू शकते.



'या' ठिकाणी पावसाचा अंदाज 


स्कायमेट हवामान अहवालानुसार, ओडिशा, छत्तीसगड आणि तमिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लक्षद्वीप, दक्षिण केरळ, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.