IMD Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (Konkan) कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं इथं येत्या दिवसांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. (Climate change) हवामानाचे बदललेले तालरंग पाहता यामुळं सध्या कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या संकटात आले आहेत. पावसानं बरसणं असंच सुरु ठेवलं, तर यंदाच्या वर्षी आंब्याच्या उत्पादनातही लक्षणीय घट होऊ शकते असं बागायतदारांचं म्हणणं आहे. (Weather Update unseasonal rain in konkan and vidarbha latest Marathi news)


आंब्याचा मोहोरही उशिरानं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी आंब्याला तुरळक मोहोर फुटण्यास सुरुवात होते. पण, यंदाच्या वर्षी तशी परिस्थिती अद्यापही तयार झाली नसल्यामुळं हिवाळ्याचा मोहोर लांबणीवर गेला आहे. परिणामी आता आंबा थेट एप्रिल महिन्यातच बाजारात येईल. (Mango season)


( Unseasonal rain) अवकाळी पावसामुळं फक्त आंबाच नव्हे, तर मिरची, कापूस, केळी या पिकांच्या उत्पादनावरही परिणाम दिसून येणार आहेत. ज्यामुळं आता शेतकरी वर्गापुढे या अस्मानी संकटाला कसं सामोरं जायचं हाच प्रश्न उभा राहिला आहे. 


दरम्यान, (Bay of bengal) बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळसदृश परिस्थितीनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सकाळच्या वेळी काहीसा गारवा, दुपारी कडाक्याचं ऊन आणि सायंकाळपासून पुन्हा गारवा असं (winter wave) वातावरण पाहायला मिळत आहे. यातही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळं प्रखर सूर्यप्रकाशाचाही अभाव दिसत आहे. 


बुधवारी अनेक ठिकाणी पावसाची हजेरी 


हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. अनपेक्षितपणे बरसलेल्या या पावसामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला, तर काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. बुधवारी (raigad) रायगड, पालघर (palghar), नाशिक (nashik), वाशिम, बुलढाणा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बसरल्या.