मुंबई: आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर विकेण्डला आणखीन तापमानाचा पारा वर चढणार असल्यानं नागरिक पुरते हैराण होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


या काळात देशात कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. 


उत्तरेकडील राज्य आणि हिमालयाच्या विभागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. परिणामी राज्यातही दिवसाच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. 


नागपूर, अमरावतीमध्ये 11-12 मार्चला तापमान 39 ते 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचणार आहे. तर मुंबईत पुढच्या आठवडाभर 38 डिग्री तापमान कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मार्च महिन्यातच मे सारख्या कडक उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.


महत्त्वाच्या शहरांमधील तापमान 
मुंबई- 37.3
नागपूर- 38
अमरावती- 38
नाशिक- 35
औरंगाबाद- 38
अहमदाबाद- 38.4
गोवा - 34.8