नाशिक : Marriage News : एरव्ही महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात ठाकलेले दिग्गज नेते आज मात्र एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होतं नाशिकमध्ये रंगलेल्या लग्नसोहळ्याचं. (Wedding at Nashik -  Chandrakant Patil discused with Chhagan Bhujbal and Sanjay Raut ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे ( Devyani Farande ) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त राज्यातल्या दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शेजारी-शेजारी बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Wedding of daughter of BJP MLA Devyani Farande at Nashik)


चंद्रकांतदादांनी भुजबळांना टाळीही दिली. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भुजबळांना नमस्कारही केला. यावेळी संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावेळी तिघांमध्ये जोरदार हास्य पाहायला मिळाले. हे राजकारणातील विरोधक असले तरी त्यांची लग्नानिमित्ताने मैत्री पाहायला मिळाली.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येताच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. या सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उदात्त दर्शन घडले.