मुंबई : राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू होत आहेत. आज रात्री 8 वाजेपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्य शासनाने काल कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात आवश्यक सेवांमध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवश्यक सेवा ( Essential Services) 


१. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने 
२. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा 
३. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा  
४. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा 
५. फळविक्रेते 


खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी. पण केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. अन्यथा दर १५ दिवसांनी कोरोना टेस्ट करुन प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.


खासगी आस्थापना व कार्यालये


- सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
- रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
- सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
- सर्व मायक्रो फायनान्स संस्था
- सर्व वकिलांची कार्यालये
- कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)


- ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमान यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील त्यांच्याकडे अधिकृत तिकिट असणं आवश्यक आहे.


- औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.


- एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.


- परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.


- आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.  


- घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.