पुणे : आपल्या विक्षिप्तपनाला विकृत म्हणून ओळखले जाईल, असे वर्तन विद्यानगरी पुण्यातील एका पतीने आपल्या पत्नीशी केले आहे. हा पती इतका विकृत आहे की, तो पत्नीने बनविलेल्या चपातीची लांबी-रूंदीही मोजतो. चपातीची गोलाई ही २० सेंटीमिटर इतकीच असायला हवी, त्यापेक्षा ती कमी किंवा जास्त असेल तर, तो आपल्या पत्नीला जबरदस्त मारहाण करतो. इतकेच नव्हे तर, हा पती आपल्या पत्नीकडून दैनंदिन कामाचा अहवालही एक्सेल शीटमध्ये मागत असतो. जर हा अहवाल द्यायला ती विसरली किंवा काही कारणाने राहून गेले तर, मारहाण ठरलेलीच. नवऱ्याच्या विकृतपणाला कंटाळलेल्या बायकोने तलाकसाठी निवेदन केले आहे.


संसाराची एक कंपनीच करून ठेवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मिररच्या हवाल्याने टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, गहू, तांदूळ, डाळ, तेल, भाज्या यांवर दररोज किती खर्च झाला याबाबत हिशोब दे. हा अहवाल एक्सल शीटमध्ये भरून ईमेलच्या माध्यमातून पाठवून देणे पत्नीला बंधनकारक आहे. नवऱ्याची नियमावली इतक्यावरच थांबत नाही तर, त्याने संसाराची एक कंपनीच करून ठेवली आहे. काही महत्त्वपूर्ण बोलायचे असेल तर, त्यासाठीसुद्धा मेलच करायचा. गेली अनेक वर्षे पत्नीवर ही नियमावली पाळण्याचे बंधन आहे आणि हे नियम तीसुद्धा पाळत आली आहे. मात्र, आता प्रकरण अगदीच असहय्य झाल्याने महिला बंडाच्या पवित्र्यात आहे.


रिपोर्ट आला नाही तर अर्वाच्च शिव्या आणि मारहाण


महिलेने म्हटले आहे की, दहा वर्षापूर्वी (२००८ ) तिचा विवाह आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या व्यक्तिसोबत झाला. त्याचा प्रत्येक कामात अतिपरीपूर्णता (ओव्हरफुलनेस) ठेवण्याला आग्रह असतो. तो म्हणतो की, दिवसभरात केल्या गेलेल्या कमाचा आढावा एक्सल शीटवर वेगवेगळ्या कॉलममध्ये विवीध रंगानी मार्क करून ईमेल करायला हवा. त्याने तिला घालून दिलेल्या एक्सल शीटच्या फॉर्मेटमध्ये एक असाही कॉलम आहे. ज्यात ठरवून दिलेले एखादे काम जर पूर्ण झाले नाही तर, ते का झाले नाही याचे स्पष्टीकरण लिहिले जाईल. फॉर्मेटमधील एकादा कॉलम भरला गेला नाही तर, तो प्रचंड संतापतो आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. अगदीच टोकाला जाऊन मारहाणही करतो. चपाती किंवा भाकरीची गोलाई बरोबर आहे की नाही हेही तो मोजत असतो. 


२०१० पासून पती अधिकच हिंस्र आणि विक्षिप्त


महिलेने म्हटले आहे की, आयटी क्षेत्रात असलेल्या पतीच्या या अतीकाटेकोरपणाला कंटाळून ती आत्महत्या करणार होती. मात्र, एक मुलगीही असल्याने तिच्याकडे पाहून तिने हा विचार मनातून झटकून दिला. २०१० पासून पती अधिकच हिंस्र आणि विक्षिप्त झाला. त्याने एक्सलशिटवर रिपोर्ट मागण्यासोबतच तो डायरीतही लिहून ठेवण्याची सक्ती त्याने केली.


दुसऱ्या दिवशीच्या नाष्ट्याची आदल्या दिवशी मंजूरी


पुणे मिररच्या वृत्तात म्हटले आहे की, दुसऱ्या दिवशी नाष्टा काय करायचा याची मान्यताही पत्नीला आदल्या दिवशी घ्यावी लागत असे.  पतीचे हे कॉर्पोरेट चोचले पुरवता पुरवता या महिलेच्या आयुष्याचा नरक बनला आहे. पत्नी आपली व्यथा सांगताना म्हणते की, तीने अनेकदा आत्महत्येचा विचा केला. पण, मुलीकडे पाहून तिने हा विचार बदलला.