देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत, `झी 24तास`ला दिली पहिली प्रतिक्रिया
Welcome to Devendra Fadnavis in Nagpur : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नागपुरात जल्लोष दिसून येत आहे.
नागपूर : Welcome to Devendra Fadnavis in Nagpur : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नागपुरात जल्लोष दिसून येत आहे. यावेळी त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्साह असला जबाबदारीची जाणीव, असे फडणवीस यांनी 'झी 24तास'ला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'मी लगेचच कामाला लागणार'
राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मुसळधा पाऊस कोसळत आहे. तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती हातळण्यासाठी आदेश दिलेले आहेत. मी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आढावा घेतला आहे. त्यांनीही आदेश दिले आहेत. कुठे आपत्ती राहिल यावर लक्षात आहे. प्रशासनाला आदेशही देण्यात आलेले आहे. जल्लोष आहे. मात्र, जबाबदारीची जाणीव आहे. मी लगेचच कामाला लागणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात आज दाखल झाले. नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी शेकडो नागपूरकरांची गर्दी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर ढोल ताशे वाजविण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि नागरिकही विमानतळावर पोहचत मोठा जल्लोष केला. नागपूर विमानतळ ते धरमपेठ आणि फडणवीस निवासस्थानापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तर लक्ष्मीभवन चौकात फडणवीस यांची जाहीर सभाही होणार आहे. नागपूरकर जनतेचे अभिवादन स्वीकारण्याकरता फडणवीसांसाठी खास रथ तयार करण्यात आला होता.
नागपूरकरांचे मानले आभार!
नागपूरकरांनी नेहमीच मला साथ दिली आहे. पाच वेळा मला आमदार केले आहे. दोन वेळ नगरसेवक म्हणून आणि महापौर म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आज पुन्हा मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो तर तुमचे प्रेम कायम आहे. तुमचे मनापासून आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपचे आमदार, अपक्ष आमदार, भाजप, शिंदे गटाचे पदाधिकारी, तसंच फडणवीसांचे शेकडो चाहते विमानतळावर दाखल झाले होते. ढोलताशांच्या गजरात फडणवीसांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. त्याआधी मुंबईहून फडणवीस इंडिगोच्या विमानाने साधेपणाने नागपूरकडे निघाले. फडणवीस यांनी विमानात कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट नाकारली. फडणवीस यांनी विमानातून 'झी 24तास'शी विशेष संवाद साधला. विमानतळावर बाहेर आल्यावर फडणवीसांची ओपन डेक ट्रकवरून खास स्वागत यात्रा काढण्यात आली. फडणवीस यांची विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंततर त्यांची विशेष सभा होणार आहे.