ठाणे : वेलकम टू ठाणे असा कोडवर्ड तयार करून आरटीआय अंतर्गत खंडणी उकळणाऱ्या दोन माजी नगरसेवकांना अटक करण्यात आलीय. ठाणे मनपाचा माजी नगरसेवक सुधीर बर्गे आणि त्याचा साथीदार आणि फरार आरोपी भाजपचा माजी नगरसेवक राजकुमार यादव या दोघांनाही अटक करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणीची वसुली करण्याचा धंदा ठाणे शहरात सुरु होता. भाजपचा विद्यमान नेता आणि माजी नगरसेवकांचा यात हात होता. माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणीची वसुली करण्यात येत होती. सुधीर बर्गे हा भाजपचा नेता यात सहभागी होता.  


माहिती अधिकार कायद्याच्या आडून बिल्डरांकडून खंडणी वसुलीचं रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं केलाय. याप्रकरणी भाजपचा विद्यमान नेता आणि माजी नगरसेवक सुधीर बर्गे, शौकत मुलानी आणि आरिफ इराकी अशा तिघांना अटक करण्यात आली होती. 


प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडे बर्गे यानं ५० लाख रूपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी ५ लाख रूपयांची वसुली केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगरमधून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला होता. तर गेल्यावर्षीची पालिका निवडणूक त्याच्या पत्नीनं भाजपच्या तिकिटावर लढवली होती. बर्गे आणि इतरांनी मिळून वेलकम टू ठाणे नावाचा एक ग्रुप तयार केला होता.