जमावबंदीमध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा रुग्णालयात जाण्यासाठी पोलीस अडवणार का?
ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीत सर्वाधिक आहेत, त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबई : भारतात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार हे देशातील महामारीच्या तिसऱ्या लाटेचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. सध्या केवळ ओमिक्रॉनच्या रुग्णांचीच नाही तर देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13 हजार 154 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, भारतातील ओमिक्रॉन प्रकरणांची एकूण संख्या 961 वर गेली आहे.
ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीत सर्वाधिक आहेत, त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुधवारपर्यंत दिल्लीत ओमिक्रॉनची 263 तर महाराष्ट्रात 252 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
दिल्लीत यलो अलर्ट लागू
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता दिल्ली सरकारने संपूर्ण शहरात यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट जारी केल्यापासून दिल्लीत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून अनेक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिल्लीत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात जमावबंदी
शहरातील कोविड 19 आणि ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आजपासून म्हणजेच 30 डिसेंबरपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
नाईट कर्फ्यू आणि जमावबंदीमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अत्यावश्यक कामासाठी, प्रवास करणाऱ्या लोकांना आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडणाऱ्यांच्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, वैध कागदपत्रे जसे की प्रवासाची तिकिटे आणि वैद्यकीय उपचारांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे दाखवून तुम्ही नाईट कर्फ्यू आणि जमावबंदी काळात घरातून बाहेर पडू शकता.
त्यामुळे तुम्हालाही प्रवासासाठी रेल्वे स्टेशन-विमानतळावर जावे लागत असेल किंवा उपचारासाठी रुग्णालयात जावे लागत असेल, तर तुम्ही रात्रीच्या कर्फ्यूमध्येही प्रवास करू शकता.
याशिवाय जर तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून प्रवास पूर्ण करून परतत असाल तर अशा परिस्थितीतही तुम्ही प्रवासाचे तिकीट दाखवून घरी पोहोचू शकता.