वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत. मानसिक आजारी असलेली व्यक्ती देखील दिव्यांग कोट्याच्या मदतीने IAS अधिकारी होऊ शकते का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. या सगळ्या प्रकरणात दिव्यांग कोटा म्हणजे काय? आणि दिव्यांग कोट्याची प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊया. 


काय आहे RPWD Act 2016 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिकबाबींनी सक्षम नसलेल्या लोकांकरिता सरकाने 2016 मध्ये राइट्स ऑफ पर्सन्स विद डिसऍबिलिटीज ऍक्ट पास केला होता. या कायद्यानुसार सरकारने पाच पद्धतीच्या दिव्यांग लोकांकरिता आरक्षण ठरवले आहे. युपीएससीमार्फत या वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये कॅटेगिरी केली आहे. नुकतेच RPWD Act मध्ये बदल करण्यात आले होते. या पाच दिव्यांग कॅटेगिरीला 'बेंचमार्क डिसॅबिलिटी' म्हटलं जातं. 


बेंचमार्क ड‍िसॅबिल‍िटीमध्ये कुणाचा समावेश होतो? 


सर्वात अगोदर दृष्टिहीन आणि दृष्टीबाधित लोकांचा समावेश आहे. ऐकण्याची समस्या असलेल्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. तसेच ज्यांच्या स्नायूंचा विकास झालेला नाही. ज्यांना चालण्यात अडचण येते. यासोबतच सेरेब्रल पॉल्सी, कुष्ठ रोग, ऍसिड अटॅक पीडित आणि जन्मतः उंची खुंटलेल्या लोकांचा यामध्ये समावेश आहे.


दिव्यांग उमेदवाराला मिळते सवलत


संघ लोक सेवा आयोग शारीरिक पद्धतीने विकलांग असलेल्या उमेदवाराला वयोमर्यादा, पदांचे आरक्षण आणि परीक्षा केंद्रांमध्ये विशेष तरतुदी याच्यात सवलत देते. तसेच यूपीएससीकरिता शारीरिक स्वरुपात विकलांग असलेल्या उमेदवाराचे निकष देखील ठरविलेले आहेत. 


फिजिकल फिटनेस महत्त्वाचा 


  • उमेदवारांचे दात, हृदय आणि फुफ्फुसे निरोगी असावेत आणि त्यांना पोटाशी संबंधित कोणताही गंभीर आजार नसावा.

  • जन्मतः विकृतीचा कोणताही दोष नसावा. तीव्र किंवा दिर्घकालिन आजाराचे कोणतेही लक्षण नसावे. 

  • उमेदवारांकडे प्रभावी लसीकरणाचे प्रमाणपत्र असावे, ते कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावेत.

  • सेवेत प्रवेश करताना टर्मिनल आजाराने ग्रस्त असलेल्या उमेदवारांना अपात्र घोषित केले जाते.

  • कॉर्नियल प्रत्यारोपणाचा अपवाद वगळता, प्रत्यारोपित अवयव असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाते.

  • IAS इच्छुकांसाठी उंची-वजन किंवा छातीचे कोणतेही मापदंड घेतले जात नाही. जर ही मोजमापे वैद्यकीय मंडळाने निर्धारित केलेल्या गुणोत्तरापेक्षा जास्त असतील तर छातीचा एक्सरे घेतला जाऊ शकतो. 

  • उमेदवाराची नजर चांगली असावी. नजर सुधारण्यासाठी, तुम्ही चष्मा, सीएल आणि शस्त्रक्रिया जसे की LASIK, ICL, IOL इत्यादी देखील घेऊ शकता.

  • ज्यांना मॅक्युलर डिजनरेटिव्ह बदलांसह मायोपिया आहे त्यांना IAS मधील सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल.

  • दृष्टीदोष असलेले लोक सेवेसाठी पात्र आहेत. एवढेच नाही तर रातांधळेपणा हे उमेदवारांना अपात्र ठरवण्याचे कारणही नाही.

  • उच्च रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या त्रासातून मुक्त झालेल्या व्यक्तीला सेवेकरिता फिट घोषित केले जाते. 

  • उमेदवाराची दोन्ही कानाची ऐकण्याची क्षमता योग्य असणे गरजेचे आहे. 

  • गर्भवती महिला उमेद्वार सिलेक्शनच्या वेळी शारीरिक प्रशिक्षण सोडून फिट राहतील. प्रसूतीनंतर फिट घोषित केलं जाईल. 


मेंटल फिटनेस आवश्यक 


कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) विहित केलेल्या नागरी सेवा परीक्षा नियमांच्या नियम 21 नुसार, उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही शारीरिक दोष नसावे. ज्यामुळेत सेवेत अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण होणार नाही.