काय आहे सुभाष देशमुख बेकायदेशीर बंगला प्रकरण ?
गुंठेवारी कायद्याअंतर्गत हे बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याचा पालिकेचा न्यायालयात अहवाल
सोलापूर: आरक्षीत जागेत बंगला बांधल्या प्रकरणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच आडचणीत आले आहेत. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार देशमुख यांचा बंगला बेकायदेशीर आहे. देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधलाय. अग्निशमन दलाच्या आरिक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. दरम्यान, काय आहे हे प्रकरण घ्या जाणून....
काय आहे प्रकरण ?
सोलापूरच्या होटगी रोडवर देशमुख यांचा नवा बंगला
२ एकरांपैकी २२ गुंठ्यावर सुभाष देशमुख यांनी बांधकाम केलं
अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी बंगला उभारला
आरक्षण उठलेलं नसतानाही देशमुख यांनी या ठिकाणी टोलेजंग बंगला उभारला
देशमुख यांच्या बंगल्याचे बांधकाम २०१२ सालचे
गुंठेवारी कायद्याखाली २००१ पर्यंतचीच बांधकामे अधिकृत केली जातात
बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी पालिकेवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका
न्यायालयाकडून पालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश
कोणतीही कार्यवाही न झाल्यानं पुन्हा अवमान याचिका दाखल
गुंठेवारी कायद्याअंतर्गत हे बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याचा पालिकेचा न्यायालयात अहवाल