Vijay Wadettiwar: राज्य सरकारनं क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. खेळाडूंना देण्यात आलेल्या 11 कोटींच्या निधीवनरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर पेसै दिले तर दिले... आणि नाही दिले तर का नाही दिले... असे सवाल विरोधक करतात. याला महत्त्व देऊ नये, असा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 


विश्व विजेत्या टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य शाही सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमारनं फायनलमध्ये घेतलेल्या कॅचवरून कॅप्टन रोहित शर्मा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. 


टी 20 वर्ल्ड कप जिंकणा-या टीम इंडियातील चौघा क्रिकेटपटूंचा विधानभवनात शाही सत्कार करण्यात आला.. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या महाराष्ट्राच्या चौघा क्रिकेटपटूंचा सरकारच्या वतीनं खास सन्मान करण्यात आला.. मात्र यानिमित्तानं विधिमंडळाच्या आवारात MPL अर्थात महाराष्ट्र पॉलिटिक्स लीगचा वेगळाच थरार पाहायला मिळाला.


विश्वविजेत्या संघाच्या स्वागतासाठीचं हे पोस्टर... मात्र त्यावर एकाही क्रिकेटपटूचा फोटो नव्हता... झळकत होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार... प्रताप सरनाईकांनी लावलेल्या या पोस्टरवर रोहित पवारांनी आक्षेप घेतला आणि वादाची इनिंग सुरू झाली.