Varsha Bungalow : `वर्षा` बंगला  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान. `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो.  12,000 चौरस फुटाचा वर्षा बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते. तसेच या बंगल्याचे नावही वर्षा नव्हते.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे बंगल्याला मिळालेले वर्षा हे नाव मिळाले. जाणून घेऊया बंगल्याच्या नावाचा इतिहास. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 फेब्रुवारी 1975 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी  मुख्यमंत्री पद सोडावे लागेच. यानंतर नाईक कृषिमंत्री झाले.  मंत्री म्हणून डग बीगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला त्यांना मिळाल. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. अगदी साधा वाटेल असा हा बंगला. पत्नी वत्सलाबाईंसह ते या बंगल्यात रहायला आले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री बंगल्या शेजारीच  डग बीगन हा बंगला होता. सह्याद्री बंगल्याशी तुलना केली असता  डग बीगन अगदीच साधा बंगला होता. 


7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक हे मुलगा अविनाश याच्या वाढदिवशी कुटुंबासह डग बीगन बंगल्यावर राहायला आले. पाऊस हा नाईक यांचा  अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. यामुळे बंगल्यावर रहायला आल्या दिवशीच नाईक यांनी डग बीगनचं नामांतर वर्षा असं केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी अशी विविध प्रकारची झाडे लावली. ते स्वत: या झाडांची काळजी घ्यायचे. 


मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतरही त्यांनी वर्षा बंगला सोडला नाही. अशा प्रकारे वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बनले.