नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुन्हा एकदा त्यांच्या शाळेत गेले होते. नितीन गडकरी ज्या शाळेत शिकले त्या दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं नितीन गडकरी पुन्हा शाळेत गेले. शिक्षकांबरोबर त्यांनी फोटोही काढले. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या शाळेतील काही किस्से सांगितले, आणि आपल्या शिक्षकांचे आभार तर मानलेच पण गौरवोद्गारही काढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता. शाळेचं आपल्यावर मोठं ऋण असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी वांद्रे वरळी सी लिंकविषयी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला, तो काय होता हे आपण खालील व्हिडीओत नक्की पाहा.