वर्धा : देशभरात नागरिकत्व विधेयकाला घेऊन अशांततेच वातावरण आहे, तर सामाजिक तेढ निर्माण होत मतभेद वाढताना दिसत आहेत, अशात वर्ध्यातील ब्रिटिशकालीन चर्च गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून एकोप्याची भावना जोपासत समाजात सामाजिक एकतेचा संदेश देताना दिसत आहे. चर्चच्या परिसरात तीन पिढ्यांपासून राहत असलेले खान कुटुंब चर्चच्या देखरेखीसाठी परिसराची साफसफाई करतात. येथील देखभालीचा जिम्मा अतिशय जिव्हाळ्याने ते पार पाडत आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ध्यातील ब्रिटिश कालीन ७५ वर्ष जुन्या चर्चची देखभाल मुस्लीम कुटुंब करीत आहे. आधी चाँद खान हे सेन्ट थाँमस चर्चची देखरेख करीत होते. त्यांच्या निधनानंतर या चर्चची देखभाल करण्याची धुरा इस्माईल खान यांच्याकडे आली. 


त्यांच्या निधाननंतर आता चर्च ची देखभाल मोहसीन खान करीत आहे. या चर्चच्या सेवेत मुस्लीम कुटुंबाने तब्बल आपल्या तीन पिढ्या घालविल्या आहेत. वर्ध्यातील खान कुटुंब हे इंग्रजांच्या काळापासून तब्बल ७० ते ७५ वर्षांपासून या सेन्ट थाँमस चर्चची देखभाल करीत आहे.


अनेक वर्षांपासून या चर्चचे इलेक्ट्रिक बिल सुध्दा खान कुटुंब भरीत असतात. त्या सर्व चर्चची रंगाई -पुताई देखील ते स्वतःच्या पैशातून करीत असतात. दर रविवारी सकाळी ७ वाजल्या पासून १० वाजेपर्यंत चर्चची सासफाई साडेतीन एकरात असलेल्या परिसरात ते करत असतात. 


खान परिवारातील चौथी पिढी देखील या चर्च ची देखभाल करणार अशी मोहसीन खान यांना खात्री आहे. 'मुस्लिम समाज हा शांती देणारा समाज आहे. या समाजात जाती, धर्म, भेदभाव नाही आहे. आम्ही जेव्हा मस्जिद मध्ये जातो तेव्हा आम्हाला शांती मिळते.' असं वक्तव्य करत आम्ही आल्लाचं घर समजून चर्चची देखरेख करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.