Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी आता कुठे? कोठडीत वाढ, सुटका की पुन्हा अटक
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा, कोल्हापूर, बीड येथे गुन्हे दाखल झालेत.
सातारा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) यांच्यासमोरील अडचणी काही केल्या संपत नाहीत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले ( Udyanraje bhosale ), खासदार संभाजी छत्रपती ( chatrapati sambhaji ) आणि मराठा आरक्षण प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा, कोल्हापूर, बीड येथे गुन्हे दाखल झालेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सर्वात आधी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून गिरगाव कोर्टात हजर केले होते. गिरगाव कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
गिरगाव न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोठडीचा कालावधी पूर्ण होताच गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी ( satara police ) घेतला. भाजप खासदार उदयनराजे भोसले ( Udyanraje bhosale ), खासदार संभाजी छत्रपती ( chatrapati sambhaji ) आणि मराठा आरक्षण प्रकरणी आक्षेपार्ह सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
याच दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापूर आणि बीड येथे गुन्हे दाखल झाले. बीडचे भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
"सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित केलं. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. अशा स्वरूपाची ही तक्रार आहे.
तर, कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातही गुन्ह दाखल झालाय. वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीची सुनावण्यात आली होती. न्यायालयाने दिलेली 4 दिवसांची पोलिस कोठडी आज संपते आहे.
आज सातारा न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा हजर केले जाणार आहे. यावेळी सातारा पोलिस पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करू शकतात. मात्र, सदावर्ते यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
असं असलं तरी सदावर्ते यांच्यावर कोल्हापूर आणि बीड येथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आज सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना मुक्त केल्यास कोल्हापूर पोलिसांकडून सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न होतील. मात्र, सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी कोल्हापूर पोलिसांना मुंबईचा न्यायालयात जावं लागणार आहे.