MSRTC ST Bus Live Tracking System : ग्रामीण भागात आजही एसटीला खूप महत्व आहे. आजही लोक एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहेत.  मात्र, बरेचवेळा एसटी लेट असते. त्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आता  एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. आता एसटी बस कुठे आहे याचा ठावठिकाणा प्रवाशांना समजणार आहे. (Where is My ST) एसटी महामंडळानं त्यासाठी अ‍ॅप बनवले आहे. (Maharashtra Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी बस डेपोत किती वाजता पोहोचणार, अपघात झाल्यास काय करायचं, एसटी बिघडल्यास त्याची माहिती या अ‍ॅपमधून मिळणार आहे. एसटीने त्यासाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम म्हणजेच व्हीटीएस (VTS) कार्यान्वित केलं आहे. एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अ‍ॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय.  मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अ‍ॅप वापरता येईल. 


सध्या शहरातील तीन स्थानकांसह राज्यातील 13 स्थानकांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (VTS) प्रणाली प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आली आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे या अ‍ॅपची निर्मिती असणार आहे. प्रवाशांना गाड्यांची सर्व माहिती मोबाईलद्वारे कळावी, यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील काही स्थानकांवर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.


एसटीकडून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या हेतूने एसटी प्रशासनाने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम सुरु केली आहे. सध्या या प्रणालीअंतर्गत पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बस स्थानकासह राज्यातील तेरा बस स्थानकांवर याची सेवा मिळत आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये एसटी प्रशासन ही माहिती देणारे मोबाईल अ‍ॅप सुरु करणार आहे. त्यानंतर ती सेवा टप्प्याटप्प्याने राज्यभर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.  र आहे. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.