मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात. अनेकदा आपण कार चालवतानाचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत असतो अशातच असा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या भूवया उंचावतील. बायकोला कार शिकवणे महागात पडले. (While teaching his wife how to drive the car fell into a well wife and daughter died nz)


हे ही वाचा - कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा



कार शिकवणे पडलं महागात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देऊळगावराजा येथील रामनगर मध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे सुट्टीत बायकोला कार शिकवत होते. कार शिकवताना त्यांची बायको स्वाती मुरकुट आणि मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ 70 फुट खोल विहिरीमध्ये पडली. या दुर्घटनेत स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. 


 



 


हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 



एकाचा जीव वाचला


त्या अपघातात अमोल मुरकुट हे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. आणि आपला जीव वाचवला. या अपघातामुळे बायको आणि मुलीचा मात्र जीव गमवावा लागला. अजूनही त्या दोघींचा मृतदेह सापडला नाही. मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


हे ही वाचा - आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर