अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : आपल्या देशातील व जगातील काही देशांमध्ये कापूस उत्पादनात यंदा घट आलीय. यावर्षी अतिपावसाने तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादनात घट आली.


पांढरं सोनं म्हणजे कापूस. विदर्भासह खरीप हंगामाचे जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. मागील दोन महिने कापसाचे भाव हे 10 हजार रुपयांवर स्थिर झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हे संभ्रमात होते. 
 
मात्र, आज अमरावतीच्या खासगी बाजारात कापसाला इतिहासातील विक्रमी भाव मिळालाय. प्रति क्विंटल ११ हजार ३०० रुपये इतका भाव या पांढऱ्या सोन्याला मिळाल्यामुळे बळीराजा आनंदी झालाय.