मुंबई : महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव (यामिनी जाधव) यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारीपासून यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना एक डायरी मिळाली. यात अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.


यशवंत जाधवचे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर  मालमत्ता आढळून आली. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. यात एक डायरी मिळाली. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ, गुढी पाडव्याला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.


या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टीमिडीया कंपनीसोबत अनेक प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. यशवंत जाधव यांच्या घरी केलेल्या छापेमारीत सापडलेली महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.


जप्त केलेले हे पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्तीमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. सुमारे १३० कोटींपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्ता या यशवंत जाधव किंवा त्यांचे सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या मालमत्ता घेतल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यात गेल्या वर्षभरात खरेदी केलेल्या २७ मालमत्तांचाही समावेश आहे


जाधव म्हणतात. ती तर माझी 'मातोश्री'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला का, याचा तपास केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी हे दावे फेटाळले आहेत. आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.


आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.