मुंबई : Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे. अजय चौधरी हे दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. ते सूरत येथे असून ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.  


अजय चौधरी हे शिवसेनेतील वरिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निषाण फडकविल्याने त्यांच्या जागी अजय चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. शिवडीतून शिवसेनेचे आमदार आहेत. 2014 साली शिवसेनेतून विधानसभेवर निवडून गेले.


2015 मध्ये शिवसेने त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले. 2019 साली शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिले. 2019 साली विधानसभेवर निवडून गेले. आता एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेचं गटनेतेपद सोपविण्यात आले आहे. मुंबईत शिवसेनेच्या काही आमदारांच्या उपस्थित बैठक झाली. याबैठकीत त्यांच्या नावावर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांना पदावरुन काढून टाकण्यात आले.


दरम्यान, शिवसेनेचे 21 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईच स्वतः शिंदे यांच्यासह नॉटरिचेबल आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तीन मंत्री शिंदे यांच्यासह गायब आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे मंत्री संदीपान भुमरे हेही शिंदे यांच्यासह नॉट रिचेबल आहेत. यात शिवसेनेचे वजनदार आमदार रात्रीपासूनच नॉटरिचेबल आहेत. 


ठाण्याचे प्रताप सरनाईक, अंबरनाथचे बालाजी किणीकर, पालघरचे श्रीनिवास वनगा, भिवंडीचे शांताराम मोरे, बोरिवलीचे प्रकाश सुर्वे, कल्याणचे विश्वनाथ भोईर गायब आहेत. त्याशिवाय यवतमाळचे माजी मंत्री संजय राठोडही गायब आहे. रायगड जिल्ह्यातलेही शिवसेनेचे तीन आमदार नॉटरिचेबल आहेत.