Leader of Opposition in Maharastra: अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर आता फक्त राष्ट्रवादीच नाही तर राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) देखील खळबळ उडाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अशा मजबूत महायुती सरकारला विरोधी पक्षनेता म्हणून टक्कर देऊ शकेल, असा काँग्रेस नेता कोण, याची चर्चा आता सुरू झाली आहे.


कोण होणार विरोधी पक्षनेता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवलाय. तर विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळलीय. मात्र प्रदेशाध्यक्ष पटोले विदर्भातले असल्यानं वडेट्टीवारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.


आणखी वाचा - किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी


सर्वाधिक वेळा आमदारपदी निवडून आलेले बाळासाहेब थोरात हे सध्या काँग्रेसचे विधानसभेतले गटनेते आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा दावा आहे. तसंच थोरातांचं दिल्ली दरबारी देखील चांगलं वजन आहे. दरम्यान, नाना पटोले हे देखील स्पर्धेत असल्याचं समजतंय. कारण काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जर प्रदेशाध्यक्ष बदलायचा असेल तर नाना पटोलेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागू शकते. त्याशिवाय संग्राम थोपटे यांच्या रुपानं आणखी एक सहावा उमेदवार देखील रिंगणात आहे. मलाच विरोधी पक्षनेता करा, अशी मागणीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केलीये.


पाहा Video



दरम्यान, 2014 ते 2023 अशा 9 वर्षांत महाराष्ट्रानं 5 विरोधी पक्षनेते पाहिले. विशेष म्हणजे त्यातले एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे 4 नेते नंतर सत्तेत सहभागी झाले. हा इतिहास लक्षात घेतला तर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी ही दुधारी तलवार असणार आहे. सत्तेशी हातमिळवणी करणारा नेता महाराष्ट्राला मिळणार की, सरकारला सळो की पळो करून सोडणारा, याचं उत्तर थोड्याच दिवसात मिळणार आहे.