रविंद्रा कांबळे, झी मीडिया, सांगली: ग्रामपंचायत निवडणूक (grampanchayat election) म्हणजे खऱ्या खऱ्या लोकशाहीची परीक्षाच जणू ! या निवडणूकीची चुरस लोकसभा विधानसभा निवडणुकींनाही मागे टाकणारी असते. अर्थात या निवडणुका जरी पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरी आपापल्या पक्षाच्या स्थानिक आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना चार्ज रिचार्ज करणाऱ्या असतात. कोणकोणती, किती गावे, कुठल्या पक्षाची आणि गटातील आहेत? त्याची त्या त्या गावातील वट किती? हे या निवडणुकावरच तर ठरते. अनेक ठिकाणी निवडणुका अटीतटीच्या आणि संघर्षपूर्ण सुद्धा बघायला मिळत असतात. मात्र ग्रामपंचायत राजकारणाचे चित्र जरासे बदलताना दिसून येत आहे. थोडे सकारात्मक राजकारणाचे विचार पुढे येत आहे. सध्या राजकारणात तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत तर फॉरेन रिटर्न (foreign return in politics) असलेल्या उच्चशिक्षित उमेदवार तरूणीची सध्या चर्चा सर्वत्र आहे. (Why Common Toilet in Village School questions raised by foreign return students during Gram Panchayat elections sangli news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटंसं गांव वड्डी. मिरज शहरालगत असणारे हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया (georgia university) येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरूणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. परदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. 


हेही वाचा - पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर


शाळेत शेकड्यांने विद्यार्थी-विद्यार्थिनी असताना सगळ्यांना मिळून एकच कॉमन टॉयलेट (common toilet) का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत ? परदेशासारखं शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅ चे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न ती विचारते. गावात एवढ्या द्राक्षबागा आहेत तर मग त्यावर प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्रीज आपल्या परिसरात का नसाव्यात, ही सगळी विकासाची कामे करण्यात किंवा सरकारकडून करून घेण्यात आपले लोकप्रतिनिधी कमी पडतात का? जो प्रगत समाज, देश यशोधराने परदेशात पाहिला तसाच गाव, समाज माझ्या गावात बनला पाहिजे हे व्हिजन (vision) डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली पाहिजे. तसेच विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ती व्यक्त करताना दिसते.   


कोण आहे यशोधरा महेंद्रसिंग शिंदे? 


यशोधरानं परदेशात उच्चशिक्षण घेतले आहे. आपल्या सांगलीच्या गावात परत आल्यानंतर आता तिला आपल्या गावाचा विकास करायचा आहे. जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न असणारी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. या फॉरेन रिटर्न उमेदवाराची पंचकोर्शित चर्चा आहे.