नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.
Nitin Gadkari PM Offer : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे. नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही,याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चाही झाल्या. स्वच्छ प्रतिमा आणि घेतलेलं काम तडीस नेण्यात गडकरींचा स्वभाव असल्यानं त्यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी नेहमीच होत असते. विरोधी पक्षांच्या नेतेही गडकरींचं नेहमीच कौतुक करतात. ब-याचदा नितीन गडकरीही अशी वक्तव्य करतात ज्यांची चांगलीच चर्चा होते.
नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी असंच एक वक्तव्य केलंय.. पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट मंत्री नितीन गडकरींनी केलाय. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने संपर्क साधून पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर फेटाळली, असा दावा गडकरींनी नागपुरातील एका कार्यक्रमात केला. ऑफर देणा-या बड्या नेत्याचं नाव गडकरींनी मात्र सांगितलं नाही.
नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी तडजोड करण्याबाबत कुणी सांगितलंय, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिलीय. देशात हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात तडजोड करू नका अशी भूमिका विरोधकांनी मांडली असल्यास त्यात चुकीचं वाटत नाही, असं राऊत म्हणाले. तर खासदार सुप्रिया सुळेंनी गडकरींचं कौतुक केलंय. गडकरी हे भाजपमधील मोठे नेते आहेत तसेच त्यांना संघाचाही पाठिंबा आहे. गडकरींनी 2009 ते 2013 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारात होतं. 2019 मध्येही त्यांचं नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत होतं मात्र,त्यांनी त्यावेळी गडकरींनी मोंदींनाच पाठिंबा दिला. पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून गडकरींनी गोप्यस्फोट केल्यानंतर गडकरींना ऑफर देणारा बडा नेते कोण ? अशी चर्चा रंगलीय.