COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या खूनामुळे शहापूर आणि परिसर हादरुन गेला होता. या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत होते. हा खून राजकीय आहे का, या दिशेनं तपास सुरू असताना अचानक ट्विस्ट आला. आणि समोर आलं एक धक्कादायक सत्य.


का केली शैलेश निमसे यांची त्यांच्यात पत्नीने हत्या?


शैलेश निमसे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.
आठवडाभरापूर्वी शैलेश यांनी त्यांच्या पत्नीला मालमत्तेच्या अधिकारातून बेदखल केलं होतं. 
तसंच घटस्फोटांसंदर्भातल्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीनं सही घेतली होती.
याचा राग साक्षीच्या डोक्यात होता, म्हणूनच तिनं एका नातेवाईकाची मदत घेत.
शैलेश यांचा काटा काढायचा ठरवलं. 
त्यासाठी साक्षीनं मारेक-यांना दीड लाखांची सुपारी दिली.
मारेक-यांनी घरात येऊन शैलेशचा गळा आवळून खून केला .
त्यानंतर निमसे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीतल्या डिक्कीत घालून देवचरी जंगलात अर्धवट जाळून टाकण्यात आला.


शैलेश निमसेंच्या हत्येचा खळबळजनक उलगडा


20 एप्रिल रोजी शहापूरजवळचं देवचरीच्या जंगलात शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसेंचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळाला होता. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज होता. त्या दृष्टीनं पोलिसांची चक्रं फिरू लागली. पण एक धक्कादायक सत्य समोर आलं. शैलेश निमसे यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी साक्षी निमसेनंच दिली होती.


सुरुवातीला या खुनाचा तपास करताना पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. ही हत्या राजकीय असल्याचा दावा करत काही संशयित नावंही पोलिसांना सांगण्यात आली होती... पण अखेर सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.