Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय का? मग वाचा ही महत्त्वाची बातमी
Gold Rate on 9th april 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. आज सर्वत्र हा सण जल्लोषात साजरा होणार. या शुभ मुहर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Gudi Padwa 2024 in Marathi : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा शुभारंभ असतो. यादिवशी महाराष्ट्रातील दारोदारी रांगोळी, विजय गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचे नवीन वर्ष चैत्र महिन्याची सुरुवात होते. आज, 9 एप्रिल सर्वत्र ठिकाणी गुढीपाडव्याचे जल्लोषात स्वागत केले जाते. या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ कार्य केले जाते. या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आता हेच सोनं 71 हजारांपर्यंत पोहोचलं आहे. सोन्याच्या या चढ्या दरामुळे सोने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.
दरम्यान सोन्याच्या भावनेने दिल्लीतील सराफा बाजारात उच्चांकी भाव गाठला आहे. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 350 रुपयांनी वाढली आणि 71 हजार 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली. यंदा सोन्याच्या किमतीत एकूण 7 हजार 700 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर चांदीचा भाव 82 हजार 400 रुपये प्रति किलो आहे. आज चांदीचा दर सरासरी एक हजार रुपयांनी वाढला.
आतापर्यंत सोन्याची वाढ विक्रमी झाली असून सोन्यात आज 400 रुपयांनी वाढ झाली. आतापर्यंतच्या सर्वोच्च दराने व्यवहार झाले. किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे यावेळी सोन्या, चांदीची दागिने कसे खरेदी होतील. याची चिंता खरेदीदारांना सतावत आहे. दरम्यान सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांकडून गुंतवणूक केली जाते. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त सोन्याच्या खरेदीचा संकल्पही अनेकांना केला. त्यामुळे सराफा बाजारात दागिने बुकिंगसह अन्य वस्तू खरेदीसाठी गर्दी केली आहे. आज चांदीची चमक कमालीची वाढली. सकाळी दुकाने उघडली तोपर्यंत भाव एक हजार रुपयांनी वाढले होते. त्यामुळे चांदीची किंमत 82 हजार रुपये झाली. हा सर्वकालीन उच्चांक आहे.
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याने दराने उसळी घेतली आहे. आज दिल्लीत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 350 रुपयांनी वाढून 71 हजार 700 रुपयांवर पोहोचली आहे. काल रात्री सोन्याची किंमत 71 हजार 350 रुपये असेल. चांदीचा भाव किलोमागे 800 रुपयांनी वाढून 84 हजार रुपयांवर पोहोचला. चालू वर्षात सोन्याच्या भावना सतत वाढत आहेत. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 7 हजार 700 रुपयांनी वाढ झाली आहे.