पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपूर विद्यापीठात प्राध्यापक विरोधात लैंगिक छळाची (Sexual abuse) तक्रार असल्याची भीती दाखवून काही प्राध्यापकांची फसवणूक (fraud) करत त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यात खंडणी मगितल्याचा आरोप असलेल्या जनसंपर्क विभागाचा साह्यक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांना या प्रकरणातील पीडित प्राध्यापकाचा पत्नीने कानशिलात लावल्याचा व्हिडिओ (video) सध्या वायरल होत आहे. व्हिडीओत (viral video) पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे. (wife argues with the man who allegedly blames his husband for abusing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''माझ्या पतीची पाच लाखांची फसवणूक केली त्यांनी जर तणावात आत्महत्या केली असती तर माझे पती वापस आणून दिले असते का? असा संतप्त सवाल केला. मात्र हा वाद सुरू असताना पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हे सुरू असताना संतापलेल्या महिलेने (woman beats a man) मात्र धवनकरांच्या कानशिलात लावली. तोच म्हणत मला दोन झापडा मारा असाही उल्लेख आहे. या प्रकरणात विद्यापीठाकडून (university) अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण हा व्हिडिओ (social media video viral) समाज माध्यमांवर वायरल होत असल्याचे नागपूर विद्यापीठात (nagpur university) गाजत असलेले प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचे बोलले जात आहे.  


पाहा व्हिडीओ 



ऑनलाईनही होतो लैंगिक छळ: 


राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे (online fraud) खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंड आरोपीच्या दत्तवाडी पोलिसांनी राजस्थान मधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या धमकीने एका तरुणाने इमारतीवरून उडी मारली होती.अन्वर सुबान खान असे अटक केलेल्याचे नाव आहे.फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठविण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट पाहिल्यानंतर लगेच आरोपीने तो डिलीट केला. त्यानंतर तक्रारदाराच्या भावाच्या मैत्रीणीने (friend phone) फोन केला. त्यांच्या भावाला कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युूड व्हिडीओ (video call) कॉल करून, ब्लॅकमेल करीत साडे चार हजार रुपये उकळल्याचे सांगितले. मात्र, तरीही आरोपीने संबंधित तरुणाला पैसे मागितले. बदनामीला कंटाळून तरुणाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण करून आरोपीची (criminal) माहिती काढून अटक केले. सध्या असे प्रकार सगळीकडेच वाढू लागले आहेत.