पत्नी पीडित पुरुषांनी मांडल्या व्यथा; महिलांप्रमाणे स्वतंत्र पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी
या अधिवेशनात पुरुष हक्क संरक्षण समितीशी संलग्न अनेक पुरुष सहभागी झाले होते. पत्नीच्या त्रासाला बळी पडलेल्या पुरुषांनी आपल्यावरील अन्याय कथन केला.
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : पुरुष हक्क संरक्षण समितीकडून(Men Rights Protection Committee) बीडमध्ये(Beed) 25 वे राष्ट्रीय अधिवेशन भरविण्यात आले. या अधिवेशनात पत्नी पीडित पुरुषांनी आपल्या व्यथा समितीसमोर मांडल्या आहेत. या अधिवेशनात विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र तसेच अन्यायग्रस्तांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग(Independent Men Commission) निर्माण करा अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली दिवसभरात दोन सत्रात
हे अधिवेशन भरविण्यात आलं आहे. विविध मान्यवर कायदेतद्यांनी या अधिवेशनाला मार्गदर्शन केले. तसेच कौटुंबिक अन्यायकारक कायद्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. सध्या देशात 498 कायद्याचा दुरुपयोग सुरू असून तो तात्काळ थांबवण्यात यावा. अशी मागणी या दरम्यान करण्यात आलीय. तर पुरुष आयोगाची स्थापना करण्यात यावी असा ठराव अधिवेशनात घेण्यात आला.
या अधिवेशनात पुरुष हक्क संरक्षण समितीशी संलग्न अनेक पुरुष सहभागी झाले होते. पत्नीच्या त्रासाला बळी पडलेल्या पुरुषांनी आपल्यावरील अन्याय कथन केला.