Titwala Crime News : मुंबई जवळील टिटवाळा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. पत्नीने पतीचा गळा आवळून  हत्या केली आहे. हत्येनंतर महिलेने पोलिसांसमोर पतीच्या मृत्यूचा बनाव केला. मात्र, चौकशीत या महिनेचे पतीची हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात घडली आहे. प्रवीण मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात आहेत. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली आहे. धक्कादायक म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर दारू मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनव प्रणितीने केला होता मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिच्या बणावाचा भांडाफोड झाला.


का केली पतीची हत्या?


टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिता मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रविण याला दारूचे व्यसन होते. प्रवीण दारू पिऊन प्रणिताशी वाद घालायचा. 3 ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला. त्याने प्रणिताची वाद घालण्यास सुरुवात केली संतापलेल्या प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केली. हत्येचे कृत्य लपवण्यासाठी प्रणिताने दारू पिल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याचा भासवले. मात्र, प्रवीणच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितावर संशय आला. पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रणिता मोरे हिला बेड्या ठोकल्यात आहेत.


छत्रपती संभाजीनगरच्या DCP दीपक गिर्हे यांच्या खाजगी कारने दोघांना उडवले


छत्रपती संभाजीनगर शहराचे DCP दीपक गिर्हे यांच्या खाजगी कारने 2 मोटार सायकलस्वारांना उडवले आहे. जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या वाहनाने व्यक्तीला उडवले आहे. त्यात डीसीपी होते का? याची चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. डीसीपी गाडीत होते का? याची तपासणी केल्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.