पुणे : मतदान पार पडले, आता वेध लागलेत ते निवडणुकीच्या निकालाचे. पुणे शहरात भाजपला गेल्यावेळसारखेच आठपैकी आठ गुण मिळतात का, याची उत्सुकता आहे. २०१४ मध्ये पुण्यात भाजपने जोरदार कामगिरी केली होती. आठही जागा भाजपने खिशात घातल्या. याहीवेळी पुण्यात भाजप दणदणीत विजय मिळवणार का, याची प्रचंड उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडगाव शेरीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर आहे. कॅन्टोन्मेंटमध्येही भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे दोघांनाही विजयाचा विश्वास आहे. 
कसब्यात मुक्ता टिळकांचे हडपसरमध्ये विद्यमान आमदार योगेश टिळेकरांचे, शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळेंचे पारडे जड दिसत आहे. पर्वतीमधून माधुरी मिसाळ हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. पण खडकवासलात मात्र राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी विजयाआधीच बॅनर लावून टाकलेत. 
 
सरतेशेवटी पुण्यातला सर्वधिक चर्चेत राहिलेला मतदार संघ कोथरुड. याठिकाणी सगळ्या विरोधकांनी किशोर शिंदेंना पाठिंबा दिला होता. पण तो प्रयत्न यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र, काही चमत्कार होणार का, याचीही उत्सुकता शिगेला आहे. २४ तारखेला काय निकाल लागणार याकडे लक्ष आहे.