मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजीनामा देणार का? अशी चर्चा सुरू झालीये. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
Devendra Fadanvis On Eknath Shinde Resign: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. निकालाला अवघे काही तास उरले असताना निकाल (Maharashtra political crisis) काय लागू शकतो यावर कायदेशीर शक्यतांच्या चर्चांना उधाण आलंय. कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल लागण्याची शक्यता असल्यानं सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांची धाकधूकही वाढलीये. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार असल्याने आता राज्यातील नेते खडबडून जागे झाले आहेत. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजीनामा देणार का? अशी चर्चा सुरू झालीये. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत, न्यायालयात कारण आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे , त्याबद्दल अंदाज लावणं योग्य नाही, असं मत देखील त्यांनी यावेळी मांडलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. निकालाआधी अशी चर्चा करणं म्हणजे पण मूर्खांचा बाजार आहे. मुख्यमंत्री राजीनामा का देखील? त्यांनी काय चूक केली आहे? असा सवाल फडणवीसांनी (Devendra Fadanvis On Eknath Shinde Resign) केला आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू, असं मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांनी निकालासंबंधी महत्त्वाचे तर्क मांडलेत. सत्तासंघर्षातील प्रलंबित सर्व याचिकांवर एकत्रित निकाल लागण्याची शक्यता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी वर्तवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार तर आहेच, परंतू उर्वरित २४ आमदारांचं काय होणार ? हा सवाल देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
शिवसेनेच्या याचिकेतील 16 अपात्र आमदार कोण?
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर.