रत्नागिरी : कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. बुवाबाजी विरोधी संघर्ष सभेचं रत्नागिरीतल्या केतन मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. रत्नागिरीतला भोंदू श्रीकृष्ण पाटील उर्फ पाटील बुवा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याचे अनेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. याचसंदर्भात रत्नागिरीत बुवाबाजी विरोधी संघर्ष सभा आयोजित करण्यात आली होती.