Maharastra Politics On Maratha Reservation : मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. लोकसभा निवडणुकीत याचा थेट फटका देखील काही उमेदवारांना बसल्याचं दिसून आलं. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा सर्वाधिक फटका बसलाय. अशातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी याच मुद्द्यावरून प्रदर्शन होताना दिसत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून विधानसभा निवडणूक गाजणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच झी 24 तासच्या AI सर्व्हेमधून लोकांनी धक्कादायक कौल दिल्याचं पहायला मिळतंय.


मराठा आरक्षण निवडणुकीचा मुद्दा असेल का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील 45 टक्के नागरिकांना वाटतंय की राज्यात मराठा आरक्षण हा विधानसभा निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. तर 45 टक्के लोकांना असं वाटतंय की मराठा आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा नसेल. तर 10 लोकांनी यावर आपलं मत नोंदवलं नाही, अशी माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. एवढंच नाही तर एकूण 20 टक्के जनता जातीच्या आधारावर मतदान करेल, असं सर्व्हेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. तर राजकीय पक्ष समोर ठेऊन 40 टक्के आपला कौल देईल. तसेच 10 टक्के जनता धर्माच्या आधारावर वोटिंग करेल, असंही सर्व्हेमधून समजतंय.


सर्वात मोठा मुद्दा कोणता?


महाराष्ट्रातील जनतेसाठी विकास हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं सर्व्हेमधून समोर आलंय. 25 टक्के लोक विकासाच्या आधारवर निर्णय घेतील. तर कल्याणकारी योजनेच्या आधारे 20 टक्के लोक आपला कौल देतील. तसेच मराठा आरक्षणचा मुद्दा हा 10 टक्के लोकांच्या विचारात असेल. तसेच भ्रष्टाचार आणि महागाई हा मुद्दा 30 टक्के लोकांचा मुद्दा आहे.  


दरम्यान, राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे.


(डिस्क्लेमर - वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)