Raj Thackeray in Gudi Padwa Melava : शिवाजी पार्कावर झालेल्या (Shivaji Park) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला अन् दिल्ली भेटीत काय काय झालं? यावर मनसे कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला.  गुढीपाडवा मेळाव्यात नेमकं राज ठाकरे काय म्हणाले? पाहा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असेल तर तेव्हाच झालो असतो. मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेल. मी आजही सांगतोय, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी शेवटचा जागावाटपाच्या चर्चेला मी 1995 साली बसलो होतो. मला असलं काही जमणार नाही. रेल्वे इंडिज हे तुमच्या कष्टाने आलेलं चिन्ह आहे. त्यामुळे इतरांच्या चिन्हावर आपण लढणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले एकत्र आले पाहिजे. म्हणून अमित शाहांना फोन करुन म्हटलो एकत्र यायचे म्हणजे काय? यासाठी अमित शाहांना भेटायला दिल्लीला गेलो. अमित शाहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झालं त्यानंतर अनेक वाटेल त्या चर्चा सुरू झाल्या. मी दिल्ली पोहचलो. राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली. दुसऱ्या दिवशीची भेट होती, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजपा आणि मोदींवर करत आहेत तशी मी करत नव्हतो. मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोध केला नाही. तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मी विरोधात बोलत असताना खिशातले राजीनामा काढून सोबत का आला नाहीत? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे.



दरम्यान, गेले काही दिवसात भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून आलं. त्यातच राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू होती.