...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
सांगली: शेतकऱ्यांनी दूध आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं. दुधाची नासाडी करु नये, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांना केले आहे. पण, हे अवाहन करतानाच, दूधाला भाव दिला नाही तर, आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. दूधाला लीटरमागे पाच रुपये दरवाढ मिळावी अन्यथा आंदोलोन सुरुर रहाणार असल्याचं ते म्हणाले. नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुख्मिमी मुर्तीला दुग्धाभिषेक घालत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्थांचा आंदोलनाला पाठींबा
दरम्यान, सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मिरज पूर्व भागातील १०० दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्राचे मालक, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दूधाचा दर वाढवून मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुरच राहील अशा इशाराही प्रकल्पग्रस्थांनी दिला आहे.
जलसंपदा मंत्र्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इशारा
दुधाच्या दराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. दूध दराबाबतचं आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये. तसं केलं तर कारवाई अटळ असून, सरकार हातावर हात धरून बसणार नाही असा सज्जड दम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांना भरलाय.