पुणे : भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटु शकते. मुनगंटीवार हेही भेटू शकतात, फडणवीस भेटू शकतात, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. त्याचवेळी मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का म्हणून, असा मिश्किल सवाल आज अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विचारला. अर्थातच भुजबळांच्या या मिश्किलीला मुनगंटीवार काय उत्तर देतात ते पाहायचे आहे. 


मुख्यमंत्री - मुनगंटीवार यांची बंद दाराआड चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनगंटीवार यांच्या भेटीनंतर जोरदार चर्चा सुरु झाली. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे असताना  त्यांच्या  अचानक भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा बंद दाराआड असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या चर्चेत नक्की काय घडले असेल याचीच जास्त उत्सुकता शिगेला पोहोचली होती.


दरम्यान,  सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली. बंद दाराआड सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही बैठक झाली. आपण जिल्ह्यातील विकास कामांसाठी भेटल्याचे  सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. तरीही चर्चा सुरुच आहेत. या भेटीवर भुजबळांना प्रश्न विचारल्यानंतरही त्यांनीही त्याच मिश्किलीने उत्तर दिले.