नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होतं आहे. शेतक-यांच्या मुद्यावरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफी, फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू, बोन्ड अळीचा प्रादुर्भाव, कापूस, धान-संत्रा उत्पादकांचे प्रश्न या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहात तीन हजारांच्या जवळपास लक्षवेधी सूचना सादर केल्या आहेत. तसेच शंभराहून अधिक अर्धा तास चर्चा तसेच ठराव मांडले आहेत.


अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता


आतापर्यंत २२ डिसेंबर पर्यंतचे कामकाज निश्चित झाले असले तरी विरोधी पक्ष नेत्यांनी हे कामकाज आणखी पुढे वाढवावे असे पत्र दिल्याने अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. १२ डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.