Ajit Pawar Interview: राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.  निवडणुका होण्याआधीच चर्चा रंगलेय ती मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी एक रोखठोक व्यक्तव्य केले आहे. यावेळी अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा दाखला दिला. पॉडकास्ट मुलाखतीत अजित पवार यांनी अत्यंत महच्वाचे वक्तव्य केले आहे. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणुक लढवली नाही. उद्धव ठाकरे हे निवडणुक न लढवता मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे पहिले मुख्यमंत्री बनले आणि त्यांनतर ते आमदार बनले.  मुख्यमंत्रिपदासाठी संख्याबळ महत्त्वाच असते. कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे संख्याबळामुळे मुख्यमंत्री झाल्याचा  दाखला अजित पवारांनी दिला. 


मी 1991 मध्ये राजकारणात आलो. देवेंद्र फडणवीस 1999 मध्ये तर एकनाथ शिंदे 2004 मध्ये राजकारणात आले. हे सर्व मुख्यमंत्री बनले. निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री बनले. पृथ्वीराज चव्हाण खासदार होते. केंद्रात मंत्री होते. तरीही ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते एमएलसी बनले. उद्धव ठाकरेही आधी मुख्यमंत्री बनले. नंतर एमएलसी बनले. असेही कधी कधी होते असते. राज्यात कुणालाही मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांच्याकडे आकडा पाहिजे. पहिल्यांदाच आम्ही महायुती म्हणून  विधानसभा निवडणुक लढत आहोत. बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे अजित पवार म्हणाले. 


पत्नीला बहीणी विरोधात उभं करायला नको होतं 


पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं करायला नको होतं अशी कबुली, पुन्हा एकदा अजित पवार यांनी दिली. कुटुंबासाठी ते चूक होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. 
जिंकणारी व्यक्ती पण कुंटुंबातील होती आणि हारणारी व्यक्ती पण घरातीलच होती.