मनमाड : मालेगावच्या चंदनपुरी गावात महिलांनी दारूबंदीचा निर्धार करीत अखेर दारूची बाटली मतदानानं आडवी केली. चंदनपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे १६ दारुची दुकानं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारूमुळे दुकानांमुळे  गावातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. गावातून  दारूची बाटली हद्दपार करण्याचा निर्धार  गावातील महिलांनी केला आणि यासाठी गावात मतदान घेण्यात आलं. 


या मतदानात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन  दारूची बाटली अखेर आडवी केली. गावातील एकूण २०९१ महिला मतदारांपैकी १२३७ महिलांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. त्यापैकी ११११  महिलांनी दारूची बाटली आडवी करण्याच्या बाजूनं मतदान केलं. दारू दुकानं सुरु राहावीत यासाठी ६९ महिलांनी  मतदान केलं. तर ५७ मते बाद  झाली. 


शासनाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेचा अहवाल जिल्हयाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल आणि आता लवकरच चंदनपुरी ग्रामपंचायत हद्दीतील दारू दुकानं  हद्दपार  करण्याची अंमलबजावणी  केली जाणार आहे. दारूची बाटली आडवी झाल्याची घोषणा होताच महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करीत  गावातून  मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. 



कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजकांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने केलीय. गाभाऱ्यातील दानावर समितीने आक्षेप घेतला. श्री पुजकांनी पुण्यात जाऊन खोट्या माहितीच्या आधारे प्रेस घेतल्याचा आरोप संघर्ष समितीने घेतलाय.