कोल्हापूर : Kolhapur News : कोल्हापुरात मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाला गळती लागली आहे. (Small Irrigation dam Burst) दरम्यान, हा बंधारा फुटून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. वेदगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Kolhapur Megholi Small Irrigation dam Burst)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून ( Megholi Small Irrigation Project Leakage) अखेर बंधारा फुटला. या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर शेकडो एकर शेतजमीनीचं नुकसान झाले आहे. 


दरम्यान, या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेदगंगा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.