नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजामुळे महिलेचा मृत्यू
राज्यात आणखी एका महिलेचा मांजामुळे मृत्यू
योगेश खरे, नाशिक : नाशिक नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मुत्यू झाला आहे. दुचाकीवरून घरी जात असताना नायलॉनमांजा मुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू होता.सातपूर येथून कामा वरून दुचाकीवर घरी जात असताना नाशिकच्या द्वारका पुलावर ही घटना घडली आहे.
नायलॉन मांजाला बंदी असतांना सर्रास पणे मांजाचा वापर सुरु आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी पिंपरीत मांजामुळे डॉक्टर तरुणीचा गाडीवरुन जात असताना मृत्यू झाला होता.
याआधी मांजाने गळा कापला गेल्यामुळे पुण्यातील महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाची मांजावर बंदी असूनही सर्रास या मांजाची विक्री केली जाते.