हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण... कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार
कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी च्या बाता करत आहे मात्र एक असं सुसंज रुग्णालय नाही जें रुग्णालय आहे त्यात सुविधा नाही जें हॉस्पिटल आहे त्यात कोट्यावधी रुपये खर्च केल जातात. त्याठिकाणी एका महिलेची प्रसूती करण्यास स्टाफ साधी तत्परता दाखवू शकत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.
Kalyan News : कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी महापालिका रुग्णालयाने चक्क नकार दिला. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली.
कल्याण स्कायवॉकवर राबिया साधू सिद नावाच्या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरिकांनी तसंच स्टेशनवरच्या हमालांनी पोलिसांच्या मदतीने एका हातगाडीवर या महिलेला मनपा रुग्णालयात आणलं. मात्र तिथल्या डॉक्टर्सनी या महिलेला दाखल करुन करुनही घेतलं नाही.. तसंच स्टाफ नसल्याचं सांगत प्रसुती करण्यासही नकार दिला. अगदी पोलिसांची विनंतीही रुग्णालयाने धुडकावून लावली. अखेर महिलेची प्रसुती रुग्णालयबाहेर झाली आणि तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.. मात्र रुग्णालयाच्या या मुजोर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
ठाकरे गट आणि मनसे आक्रमक
कल्याणच्या रुक्मिणीबाई महापालिका रुग्णालयात आता ठाकरे गट आणि मनसेनं ठिय्या आंदोलन केले. या रुग्णालयाने एका गरोदर महिलेच्या प्रसुतीला नकार दिला होता. त्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती झाली. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालीय. जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ठाकरे गट आणि मनसेने दिला आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण स्कायवॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी हमालाच्या मदतीने तातडीने त्या महिलेला हातगाडीवर टाकून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने रुग्णालयात स्टाफ नसल्याचे कारण देत तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिस आणि हमालांनी विनंती करुन देखील रुग्णालयाने महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही.अखेरी त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली आहे. प्रसूती झालेल्या महिलेचे नाव राबिया साधू सिद असे आहे. तिला मुलगी झाली आहे. या घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
राबिया सीद ही महिला गराेदर होती. तिला स्टेशन परिसरातील स्कायवॉकर प्रसूतीच्या वेदना सुरु होताच हा प्रकार नागरीकांनी पाहिला. तिची अवस्था पाहून नागरीकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉकगाठला. तिची अवघडलेली अवस्था पासून तातडीने तिला हातगाडीवर ठेवले. हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुक्णीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती पश्चातही रुग्णालय बधले नाही.
या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले.
दरम्यान घडल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणाला बांधिल नाही. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणाला उत्तरे देणार नाही. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार नकार दिला.