Pune News Today: पत्नीने सुरुवातीला पतीला विष प्रयोग करुन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला अपयश आले. मग मात्र पत्नीने पतीला मारण्यासाठी भयंकर प्लान रचला. पत्नीने थेट पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाम्पत्याला आठही मुली झाल्याने पतीकडून पत्नीला सातत्याने त्रास दिला जात होता. तसंच, तो दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचा सुगावाही पत्नीला लागला होता. त्यामुळं तिने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला मुलगा हवा होता पण आठ ही मुली झाल्या होत्या. त्यामुळे पती सातत्याने पत्नीवर राग राग करत असे व तिला मारहाणही करत होता. त्यामुळे पत्नी संतापली होती. या संतापाच्या भरात तिने त्याच्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. 


विष प्रयोग केल्याचा प्रयत्न फसल्यानंतर तिने आणखी एक प्लान रचला. तिने पतीला मारण्याची सुपारी दिली. त्याच परिसरात राहणाऱ्या शिवम दुबे उर्फ दुब्या आणि अमन पुजारी यांना दोन लाखांची सुपारी दिली. सुपारी मिळालेल्या पैशातून तलवारी देखील विकत घेतल्या. ७ डिसेंबरच्या रात्री पती दारू पिऊन झोपला असल्याचे पत्नीने हल्लेखोरांना सांगितले. संपूर्ण खबरदारी घेत आरोपींनी घरात घुसून पतीवर तलावरीने सपासप वार केले. त्यानंतर त्या दोघांनी पतीवर हल्ला केला. मात्र तो ही प्रयत्न फसला. दोघांनी पतीवर हल्ला केला त्यामुळं तो गंभीर जखमी झाला. मात्र, तो मृत पावला आहे असं समजून ते तिथून निघून गेले. मात्र पती बचावला होता. 


या घटनेनंतर मुलीने या बाबत निगडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. निगडी पोलिसांनी आठ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर तपासात पत्नीनेच ही सुपारी दिल्याचे समोर आले. त्यानुसार निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन्ही आरोपींना अटक केलीय.