औरंगाबाद : राज्य महिला आयोगाच्या वतीने औरंगाबादमधल्या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिला कैद्यांना यावेळी साडीवाटप केलं. 


महिला कैद्यांसोबत भाऊबीज साजरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैदी महिलांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा ,यासाठी हा सण साजरा करण्यात आल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलं. 


वैद्यकीय अधिकारी नेमणार


यापुढे शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी, वैद्यकीय अधिकारी नेमणार असल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलं.