धक्कादायक, महिला - पुरुषाची हत्या करुन नदीत फेकले, हात आणि पायही होते बांधलेले
Women and men murdered, bodies thrown in Vena river : शहरालगतच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला आणि पुरुषाची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : Women and men murdered, bodies thrown in Vena river : शहरालगतच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला आणि पुरुषाची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. या दोघांचेही हातपाय दोरीने बांधलेले अवस्थेत होते. रुई खैरी शिवार जवळील वेणानदी पात्रात या दोघांचे मृतदेह गुरुवारी आढळून आले. सुमारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील हे दोघे असल्याचे सांगितले जात आहे.
वेणा नदीजवळील पुलावरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीला गुरुवारी सकाळी नदीपात्रात एका पुरुष आणि महिलाचा मृतदेह तरंगांना दिसला. त्याने लगेच याबाबत पोलिसांनी माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगतानाचे हे दोन्ही मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मदतनीसाच्या साहाय्याने ते दोन्ही मृतदेह बाहेर काढले. हे दोन्ही मयताना नायलॉन दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते.
तसेच 15 ते 20 किलो वजनाच्या दगडाला बांधून त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचा अंदाज आहे. पुरावे नष्ट करण्याकरिता त्यांची हत्या करुन मृतदेह दगडाला बांधून नदीत फेकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी त्यांचे मृतदेह नदीत तरंगताना आढळले असले तरी त्यांची हत्या आदल्या दिवशी वा रात्रीच झाली असण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान पोलीस आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता लोकांचा तपास करत आहे. या हत्येमागे नेमकं कारण काय ? मयत पुरुष आणि महिला कोणत्या परिसरात राहणारे होते याचा शोध घेणे सुरु आहे.