`झुकेगा नही` म्हणणाऱ्या `पुष्पा`ला झुकवलं, महिलांनी बदड बदड बदडलं, VIDEO VIRAL
महिलांनी मारहाण करून दिलं पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर घेऊ नंतर त्यांना व्हिडिओ कॉल करणाऱ्या एका विकृत दुकानदाराला महिलांनी चांगलाच धडा शिकवला. दुकानात घुसून महिलांना या दुकानदाराला चोप दिला.
बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार काही तरी कारण काढून मोबाईल नंबर घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा.
त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा. यासंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. याची दखल घेत स्थानिक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराजच्या दुकानात जाऊन त्याला जाब विचारला. सुरुवातीला पुष्पराजने महिलांना उडवाउडवीची उत्तरं दिली.
त्यामुळे संतापलेल्या महिलांना पुष्पराजला चांगलाच चोप दिला. तसंच त्याला माफी मागायलाही भाग पाडलं. यानंतर महिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.