Crime News: भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावर एका ट्रॅव्हलर बॅगेत महिलेचा मृतदेह कापून फेकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आह. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.


आरोपीला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तन सागरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती व या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीच्या भावाला अटक केली आहे. अंजली सिंग असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून मिंटू सिंग असं आरोपी पतीचे नाव आहे.


म्हणून पत्नीची केली हत्या


मिंटू सिंग याला त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरून संशय होता. अनेकदा दोघांमध्ये यावरून वाददेखील व्हायचे. सततच्या वादा-वादीला कंटाळून आरोपी मिंटू पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने आठ दिवसांपूर्वी अंजलीची धारदार शस्त्राने हत्या केली होती.


समुद्रात बॅग फेकून दिली


पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मयत अंजलीचे मुंडके वेगळे कापून शिराचे तुकडे केले. त्यानंतर एका ट्रॅव्हल बॅगमध्ये भरले होते. आपल्या भावाच्या मदतीने अंजलीचा मृतदेह असलेली बॅग समुद्रात फेकून दिली, या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे.


काय घडलं नेमकं?


पोलीसांना उत्तन समुद्र किनारी या महिलेचा मृतदेह मुंडके नसलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळं तिची खरी ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तिच्या हातावर असलेल्या टॅटूच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवली. ओळख पटवल्यानंतर पोलिस तिच्या घरापर्यंत पोहोचले. चौकशी करत असतानाच त्यांना तिच्यावर पतीवर संशय आला. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. अधिक चौकशीदरम्यान पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आपणच तिची हत्या केल्याचा जबाब त्यांनी दिला. गुन्हा कबुल करताच पोलिसांनी तिची हत्या करणाऱ्या आरोपी पती व त्याच्या भावाला अटक केली आहे.


पतीसोबतच्या भांडणात तीन मुलांना विहिरीत फेकले


एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलांचा जीव घेतला आहे. फोनवर बोलताना पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून महिलेने तिच्याच तीन मुलांना विहिरीत फेकले आहे. मुलांना विहिरीत फेकल्यानंतर तिने स्वतःला घरात बंद करुन पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. आग भडकत गेल्यानंतर शेजाऱ्यांनी तिचा आरडा-ओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. घरावर पाणी टाकून तिला आग विझवण्यात आली. तिला घराबाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी मुलांविषयी विचारणा केली. त्यावर तिने घडलेली घटना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी तिला ताब्यात घेतले आहे.