औरंगाबाद : औरंगाबादमध्ये विद्युत गिझर लावत असताना झालेल्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिडको येथील आविष्कार कॉलनीत येथे आज सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दत्तात्रेय महाराज दहिवाळ हे सिडको येथील आविष्कार कॉलनी येथे राहतात. आज सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी पुष्पलता या बाथरूममधील विद्युत गिझर लावत होत्या, तेव्हा गिझरमध्ये अचानक स्फोट झाला. यात त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. यात गंभीर भाजल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय घाटी येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचा शहरात मोठा भक्त परिवारात असून पुष्पलता या गुरू आई म्हणून परिचीत होत्या.