पुणे : आपण बऱ्याचदा असे ऐकले आहे की, काही पोलीस कोणत्याही छोट्यामोठ्या दुकानदाराकडून पैसे घेतात किंवा काही वेळेला फ्रीचे जेवण, खाण्याचे पदार्थ मागवतात, जे चुकीचे आहे. परंतु काही पोलिसांना याचे गांभीर्य समजत नाही आणि ते सुधारत देखील नाही. अशातच पुण्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात एका महिला पोलीस अधिका-याला फुकट बिर्याणी हवी असल्याचं संभाषण उघड झालं आहे. ही महिला आधिकारी आपल्या कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला चिकन बिर्याण, मटण बिर्याणी, कोळंबिचे कालवण वगैरे मागवतेय. त्याच वेळेला पैसे देण्यासंदर्भात ती म्हणते की, पीआयला सांग.


नंतर कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला विचारते की, तुम्ही हे कसे घेता. तेव्हा तो त्या महिला अधिकाऱ्याला सांगतो की, पैसे देऊनच आम्ही घेतो. तेव्हा ती महिला म्हणते की, आपल्या हद्दीतल्या गोष्टींचे पैसे का द्यायचे? असे पैसे द्यायचे असते का? हे मला तर माहित नाही.



पुण्यात ही ऑडिओ क्लीप भलतीच व्हायरल झाली आहे, त्यावर गृहमंत्र्यांकडून  दखल घेण्यात आली आहे, त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करु असे देखील सांगितले आहे.