लिंग परिवर्तन : महिला पोलीस कॉन्स्टेबलची मुंबई उच्च न्यायालयात धाव
लिंग परिवर्तनानंतर पुन्हा सेवेत घ्यावं यासाठी बीडच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : लिंग परिवर्तनानंतर पुन्हा सेवेत घ्यावं यासाठी बीडच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बीड पोलीस अधिक्षक दलात काम करणारी ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं लिंग बदलण्याकरिता सुट्टी द्यावी असा अर्ज केलाय.
यामुळे बीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीस दलच नाही तर राज्याचा गृह विभागीही हादरलाय. या विषयावर पोलिसांकडून कोणीही बोलायला तयार नाही. मात्र, त्या महिला पोलिसानं आपली मागणी लावून धरलीय.